Ladaki bahin yojana update: लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार? काय म्हणाले मुख्यमंत्री?

Ladaki bahin yojana update: महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी अशा माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आली आहे. या आधीच्या माहिती सरकारने जाहीर केलेल्या माझे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये शासन देत होते.


त्यावेळी जाहीर केलेला निकषाप्रमाणे, अनेक अपात्र महिलांनीही अर्ज दाखल केले होते. अशा महिलांनाही आतापर्यंत दीड हजार रुपये लाभ मिळत होता.
परंतु, आता नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारने या योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता अनेक अपात्र महिलांना या मिळणाऱ्या लाभापासून मुकावे लागणार आहे.


या योजने संदर्भात अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या, यामध्ये या योजनेचे निकष बदलण्यात येतील तसेच अपात्र महिलांचे या मिळालेल्या लाभाचे पैसे काढून घेण्यात येणार अशा चर्चांना उधाण आले होते.

Ladaki bahin yojana update: या संदर्भात आता, सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सरकारचे म्हणणे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत. सर्व निकष पूर्वी जाहीर केले होते त्याप्रमाणेच राहतील. तसेच ज्या अपात्र महिलांना या योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला आहे त्यांचे लाभाचे पैसेही परत घेतले जाणार नाहीत. परंतु त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही.


पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना, उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले की, अनेक अपात्र बहिणींनी या आधीच आपले नाव या योजनेतून माघारी घेतली आहे. तसेच अनेक अपात्र महिलांनी लाभाचे मिळालेले पैसेही सरकारला परत केले आहेत.


राज्यातील जवळपास पाच लाख अपात्र बहिणींना या योजनेपासून मुकावे लागणार आहे. जानेवारी 2025 पासून या अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद होईल.

Leave a Comment